Advertisement

67th National Film Awards - मराठी चित्रपटांचा देखील बोलबाला

हिंदीसोबतच मराठी चित्रपटांचा बोलबाला देखील यावेळी पाहायला मिळाला.

67th National Film Awards - मराठी चित्रपटांचा देखील बोलबाला
SHARES

सोमवारी ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट (67th National Film Awards) पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात २०१९ मध्ये रिलीज चित्रपटांना पुरस्कार देण्यात आला आहे. हिंदीसोबतच मराठी चित्रपटांचा बोलबाला देखील यावेळी पाहायला मिळाला.

नुकतंच बार्डोनं सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून पुरस्कार पटकावला. त्यानंतर आता ‘आनंदी गोपाळ’ (Anandi Gopal) या चित्रपटाची देखील राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये वर्णी लागली आहे.

सामाजिक समस्यांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांच्या विभागात ‘आनंदी गोपाळ’नं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. सोबतच सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईनसाठी देखील या चित्रपटाला पुरस्कृत करण्यात आलं आहे.

वर्षभरात प्रदर्शित झालेल्या देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. मनोरंजन सृष्टीतील हा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळं गेल्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा एक वर्षानंतर साजरा केला जात आहे. हा पुरस्कार डायरेक्टोरेट ऑफ फ़िल्म फेस्टिवल या संस्थेतर्फे दिला जातो.



हेही वाचा

National Award - सुशांत सिंह राजपूतचा 'छिछोरे' ठरला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील आणखी एक कलाकार कोरोना पॉझिटिव्ह

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा