Advertisement

मे अखेरीस लागणार 12 वीचा निकाल?


मे अखेरीस लागणार 12 वीचा निकाल?
SHARES

यंदा 10 वी आणि 12 चे निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकालासाठी विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागणार नाही. मे अखेरीस 12 वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. तर 10 वीचा निकालही यावर्षी लवकर लागणार असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या असल्या तरी अद्यापही बोर्डाकडून तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

याआधी ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांनी परीक्षेदरम्यान पेपर तपासणीवर बहिष्कार घातला होता. त्यामुळे यंदा निकाल उशिरा लागतो की काय? अशी शंका होती. मात्र शिक्षकांनी वेळेत संप मागे घेतल्यामुळे बारावीचा निकाल मे अखेरीस लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा