Advertisement

वैद्यकीय महाविद्यालयातील 17 सहायक प्राध्यापक सेवेत कायम


वैद्यकीय महाविद्यालयातील 17 सहायक प्राध्यापक सेवेत कायम
SHARES

शासकीय दंत महाविद्यालय आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील दंतशास्त्र विभागात 17 सहायक प्राध्यापक काही काळासाठी नियुक्त करण्यात आले होते. मात्र आता त्या 17 सहायक प्राध्यापकांची सेवा नियमित करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. राज्यात सध्या 16 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि 3 दंत महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार प्रध्यापकांची संख्या निश्चित करण्यात येते. ही पदे रिक्त राहिल्यास महाविद्यालयाच्या मान्यतेवर परिणाम होतो. तसेच रूग्णसेवेतही अडचणी येतात. वाढती वैदयकीय महाविद्यालयाची संख्या पाहता, चांगले डॉक्टर महाविद्यालयाला मिळणे आवश्यक आहे. याचसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सेवा नियमित करण्यात आलेल्या प्राध्यापकांमध्ये 8 सहायक प्राध्यापक आणि 9 दंतशल्य चिकित्सकांचा समावेश आहे. विभागीय निवड मंडळातर्फे निवड झालेल्यांना कोणतेही आर्थिक लाभ मिळत नव्हते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा