वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ दिंडी

 Kurar Village
 वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ दिंडी
 वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ दिंडी
 वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ दिंडी
 वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ दिंडी
 वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ दिंडी
See all

कुरार व्हिलेज – वाचन प्रेरणा दिनानिमित्त मालाड पूर्वेकडील कुरार व्हिलेज परिसरातील जिजामाता विदयामंदिर शाळेत विदयार्थ्यांनी शनिवारी ग्रंथ दिंडी काढली. वाचन दिनानिमित्त शाळेत पुस्तक जत्रा भरवण्यात आली. तसेच प्रत्येक विदयार्थ्याने शालेय पुस्तकातील एकएक परिच्छेद वाचला. शिक्षकवर्गाने श्यामची आई पुस्तकाचे वाचन केले. विदयार्थ्यांनी कसे वाचावे याबाबत शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केले.

'विदयार्थ्यांनी दररोज वाचावे,तसेच पुस्तक न वाचता रस्त्यावरून प्रवास करताना तेथे असलेले फलक वाचावे', असा संदेश शाळेच्या मुख्याध्यापिका करुणा विश्वास नलावडे यांनी विदयार्थ्यांना दिला. यावेळी शाळेच्या उपमुख्याध्यापिका मनिषा वेदक, माजी नगरसेविका रिना सुर्वे यांनी विदयार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले.

Loading Comments