Advertisement

शाळांची सद्यस्थिती सुधारण्यासाठी चर्चासत्र


शाळांची सद्यस्थिती सुधारण्यासाठी चर्चासत्र
SHARES

चेंबूर - राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळांची सद्यस्थिती लक्षात घेऊन यावर ठोस प्रभावी उपाय सर्वसंमतीनं काढण्यासाठी चेंबूर एज्यूकेशन सोसायटीनं चर्चासत्राचं आयोजन केलं आहे. चेंबूरच्या रामकृष्ण चेंबूरकर मार्ग येथील एज्युकेशन सोसायटी सभागृहात 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 1.30 या वेळेत हे चर्चासत्र होईल. यामध्ये राज्यातील मराठी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक असे निमंत्रित तीनशे जण सहभागी होणार आहेत. राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. आनंद काटीकर हे मार्गदर्शन करणार आहेत.

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा