Advertisement

मुंबई पाठोपाठ ठाण्यातील शाळा, कॉलेजेस 'या' तारखेपर्यंत बंद

ठाण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई पाठोपाठ ठाण्यातील शाळा, कॉलेजेस 'या' तारखेपर्यंत बंद
SHARES

राज्यात कोरोनाबाधित (corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे मुंबई पाठोपाठ ठाणे महापालिकेनं (thane municipal corporation) सुद्धा १ ते ९ वीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

याशिवाय अकरावीचे वर्गही ३१ जानेवारीपर्यंत बंद असणार आहेत. या कालावधीत पहिली ते नववी आणि अकरावीचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीनं सुरू राहणार आहेत.

ठाण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ठाण्यातील पहिली ते नववी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे पालिका आणि ठाणे महापौरांनी घेतला आहे. अकरावीचे वर्ग ही बंद ठेवणार आहेत. फक्त १० वी आणि १२ वीचे वर्ग ऑफलाइन सुरू ठेवणार असल्याचं ठाणे पालिकेनं ठरवलं आहे.

मुंबई महापालिकेच्या हद्दीत १० वी आणि १२ वीचे वर्ग वगळता इतर सर्व माध्यमाच्या शाळा प्रत्यक्ष बंद ठेऊन ऑनलाइन पद्धतीनं सुरू ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहे. सद्यस्थितीत देशामध्ये आणि बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रसार वाढत आहे.

इयत्ता १ ली ते इयत्ता ९ वी आणि इयत्ता ११ वी या वर्गातील विद्याथ्याने प्रत्यक्ष शाळेत उपस्थित न राहता यापूर्वी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ऑनलाईन पद्धतीनं वर्ग सुरू राहणार आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळेतील १५ ते १८ वर्ष वयोगट असलेल्या विद्यार्थ्याचे नियोजनानुसार, लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून लसीकरण सुरू राहणार आहे. याकरीता महापालिका शाळांसह अन्य खाजगी शाळांमधील लसीकरणास पात्र असणाऱ्या १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्याचे लसीकरण करून घेण्यासाठी शाळेत बोलवता येईल.

दरम्यान, ठाणे मनपा आयुक्त विपीन शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. ठाणे मनपा आयुक्तांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. साधारण लक्षणं असल्यानं त्यांनी कोरोना चाचणी केली होती.



हेही वाचा

मुंबई-गोवा क्रूझवरील २००० पैकी ६६ प्रवासी पॉझिटिव्ह

मुंबईतल्या पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा