ऑल द बेस्ट...

 Mumbai
ऑल द बेस्ट...
Mumbai  -  

मुंबईत सोमवारपासुन टी.वाय.बी.ए.ची परीक्षा सुरू होत आहे. त्यामुळे मुलांमध्ये थोडं तणावाचं वातावरण आहे. पहिला पेपर 11 वाजता असला तरी, सकाळी 9 वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी परिक्षाकेंद्रांवर हजेरी लावली आहे. परीक्षेचा पहिलाच दिवस असल्यामुळे रूम नंबर, हॉल तिकीट, सीट नंबरमध्ये गोंधळ होऊ नये म्हणून विद्यार्थी लवकरच कॉलेजमध्ये गेले आहेत. यावर्षी उत्तरपत्रिका तपासणीमध्ये वेळ वाया जाऊ नये, लवकर निकाल लागावा यासाठी कुलगुरूंनी उत्तरपत्रिकांची ऑनलाईन तपासणीची घोषणा केली आहे. त्यानुसार प्रक्रियाही सुरू झाली आहे. मात्र अद्याप प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे यावर्षीही परीक्षांचे निकाल उशिरा लागणार असं चित्र दिसतंय. 


परीक्षेआधी काही गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही लवकरच परीक्षा केंद्रावर आलो आहोत. यावर्षी आमच्या उत्तरपत्रिकांची ऑनलाईन तपासणी होणार आहे. त्याच वेगळं टेंशन आहेच. मात्र आता ऑनलाईन तपासणीच टेंशन न घेता, परीक्षेवर लक्ष केंद्रीत करायच मी ठरवलं आहे.

वेदांगी सातर्डेकर,विद्यार्थीनी

आजपासून परीक्षा आहे, वर्षभरापासून केलेला अभ्यास, घेतलेली मेहनत आज सत्यात उतरवायची आहे. परीक्षेबरोबरच ऑनलाईन तपासणीचही टेंशन आलं आहे. हाताने उत्तरपत्रिका तपासल्या जायच्या तेव्हा शिक्षक पुन्हा पुन्हा उत्तर तपासायचे. मात्र आता ऑनलाईन झाल्यामुळे अशाच पद्धतीने उत्तरपत्रिका तपासणी होणार का? या प्रक्रियेवर, गुणांवर कोणाचं लक्ष असणार याविषयी काहीच कल्पना नसल्यामुळे परीक्षेबरोबर ऑनलाईन तपासणीचं दडपणही आहे.

परेश हाते,विद्यार्थी

Loading Comments