Advertisement

रायगड मिलिटरी स्कूलचा स्नेहसंमेलन सोहळा संपन्न


रायगड मिलिटरी स्कूलचा स्नेहसंमेलन सोहळा संपन्न
SHARES

ओशिवरा, जोगेश्वरी येथील सीबीएसई बोर्डाच्या रायगड मिलिटरी स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर उपस्थित होते. वर्षभर शाळेच्या विविध शैक्षणिक आणि कलात्मक उपक्रमांत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनात गौरव करण्यात आला. शाळेच्या नवीन संकेतस्थळाचं उद्घाटनही वाडकर यांच्या हस्ते करण्यात आलं.


नृत्याविष्काराची झलक

भारतातील विविधता ही शाळेच्या वार्षिक संमेलनाची थीम ठेवण्यात आली होती. त्यानुसार शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्याविष्कार आणि नाटकाच्या स्वरूपात आपल्या कलाकृती सादर केल्या.


देशाची वैशिष्ट्ये दर्शवणाऱ्या कलाकृती

देशाच्या विविध राज्यातील वैशिष्ट्ये दर्शवणाऱ्या या कलाकृती होत्या. इंडियन आयडॉल झालेला गायक रवी त्रिपाठी, शाळेचे अध्यक्ष आणि कार्यकारी व्यवस्थापक राजीव घरत, सचिव अजय पाटणकर, मुख्याध्यापिका आरती झा या स्नेहसंमेलन कार्यक्रमात उपस्थित होते. या संमेलनाला पालकांचा मोठा सहभाग लाभला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा