Advertisement

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीद्वारे नवीन सराव प्रश्नसंच


दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीद्वारे नवीन सराव प्रश्नसंच
SHARES

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षांचं वेळापत्रक काही महिन्यांपूर्वी जाहीर केलं आहे. यानुसार येत्या १ मार्चपासून दहावीची परीक्षा घेण्यात येणार असून परीक्षेसाठी अवघे ९६ दिवस उरले आहेत. यंदा दहावीचा अभ्यासक्रम बदलला असून विद्यार्थ्यांना अभ्यास करणं सोप जावं यासाठी बालभारतीद्वारे नव्या सराव प्रश्नसंचाची निर्मिती करण्यात आली आहे.


सराव प्रश्नसंच तयार

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षात दहावीचा नवा अभ्यासक्रम अंमलात आणण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी नवीन पुस्तकं आणि कृतीपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. त्याला अनुसरून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळानं सराव प्रश्नसंच तयार केले आहेत.


प्रश्नसंच 'येथे' करणार अपलोड 

येत्या मार्च महिन्यात दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सराव करणं सुलभ व्हावं यासाठी हे प्रश्नसंच तयार करण्यात आलं असून मंडळाच्या संकेतस्थळावर हे प्रश्नसंच अपलोड करण्यात येणार आहे. याबाबतच वेळापत्रक बालभारतीनं जाहीर केलं असून त्या त्या विषयाचं प्रश्नसंच आणि कृतीपत्रिका www.ebalbharati.in  या संकेतस्थळावर जाहीर केल्या जाणार आहेत. या कृतीपत्रिका विद्यार्थ्यांनी स्वत: सोडवायच्या असून आवश्यक असल्यास शिक्षक किंवा पालकांचं मार्गदर्शन घ्यावं, असं बालभारतीने म्हटलं आहे.


व्हिडिओही करणार अपलोड

विशेष म्हणजे हे सराव प्रश्नसंच अपलोड झाल्यानंतर काही दिवसांनी त्या विषयाची सविस्तर उत्तरपत्रिकाही बालभारतीच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येणार आहे. याशिवाय संबंधित विषयांच्या तज्ज्ञांचे त्या विषयावर आधारित व्हिडिओही अपलोड करण्यात येणार असून या दोन्ही माध्यमातून विद्यार्थ्यांना चुका सुधारण्यास मदत होणर आहे.


वेळापत्रक असं?

भाषाप्रश्नपत्रिकाउत्तरपत्रिका/ व्हिडिओ
प्रथम भाषा२६ नोव्हेंबर६ डिसेंबर
द्वितीय भाषा२७ नोव्हेंबर ७ डिसेंबर
तृतीय भाषा २८ नोव्हेंबर   ८ डिसेंबर
विज्ञान १ २९ नोव्हेंबर ९ डिसेंबर
विज्ञान २ ३० नोव्हेंबर१० डिसेंबर
गणित १ १ डिसेंबर ११ डिसेंबर
गणित २  २ डिसेंबर १२ डिसेंबर
इतिहास व राज्यशास्त्र ३ डिसेंबर १३ डिसेंबर
भूगोल ३ डिसेंबर १४ डिसेंबर


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा