Advertisement

‘बार्टी’तर्फे MPSC चे ऑनलाईन कोचिंग क्लास

धनंजय मुंडे यांनी ऑनलाइन क्लासेस सुरू करण्याच्या सूचना बार्टीला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने ‘बार्टी’ने स्वत: पुढाकार घेऊन ऑनलाइन एमपीएससी क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘बार्टी’तर्फे MPSC चे ऑनलाईन कोचिंग क्लास
SHARES

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी ) यांच्यामार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग सुरू करण्यात येणार (barti to start online coaching classes for mpsc students) असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

कोरोना संकट आणि लाॅकडाऊनमुळे एमपीएससीची परीक्षा देण्यास इच्छुक विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये देखील खंड पडला आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यात यावं अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. त्यापार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ऑनलाइन क्लासेस सुरू करण्याच्या सूचना बार्टीला दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने ‘बार्टी’ने स्वत: पुढाकार घेऊन ऑनलाइन एमपीएससी क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

एमपीएससी  इच्छुक उमेदवारांकडून यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी ‘बार्टी’च्या http://www.barti.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड वरील ‘एमपीएससी परीक्षा मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश अर्ज’ या लिंकवर क्लिक  करावं. ऑनलाईन कोचिंगचे बार्टीचे फेसबुक पेज व यूट्यूब चॅनल वरून लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात येणार  आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आजपासून नोंदणी  सुरू करावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

पुढील आठवड्यात या क्लासेसचं उद्घाटन करण्यात येणार असल्याचे बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा