Advertisement

मुंबई महापालिकेचा 'या' विद्यार्थ्यांसाठी ३९ कोटींचे टॅब खरेदीचा निर्णय

मुंबई महापालिकेनं १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदीचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. यासाठी तब्बल ३९ कोटी रुपये मोजण्यात येणार आहेत.

मुंबई महापालिकेचा 'या' विद्यार्थ्यांसाठी ३९ कोटींचे टॅब खरेदीचा निर्णय
SHARES

मुंबई महापालिकेनं १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदीचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. यासाठी तब्बल ३९ कोटी रुपये मोजण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करणे सोयीचे व्हावे म्हणून टॅब खरेदी करण्याचा निर्णय मुंबई पालिकेनं घेतला आहे. मात्र प्रत्यक्षात टॅब मिळेपर्यंत परीक्षाही होऊन गेलेली असणार आहे.

मार्च महिन्यात दहावीची बोर्डाची परीक्षा होणार असून येत्या काही दिवसांत पूर्वपरीक्षाही सुरू होणार आहे. तसेच, १०वीचे वर्गही आता संपत आलेले आहेत. आता कार्यादेश मिळाल्यानंतर तब्बल २ ते अडीच महिन्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी टॅब मिळणार आहे. मात्र तोपर्यंत १०वीची परीक्षाही संपलेली असेल.

मुंबई महापालिकेचा टॅब खरेदीसाठी तब्बल ३९ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. यामध्ये प्रत्येक टॅबसाठी २० हजार ५३२ रुपये खर्च येणार आहे. मुंबई महापालिकेनं २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी व्हावे तसेच शिक्षकांच्या अनुपस्थितीत विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा हा या मागचा उद्देश होता. आता मुंबई महानगरपालिकेकडून टॅब खरेदी करण्यात येणार आहे.

यासाठीचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. या टॅबमध्ये मराठीसह उर्दू, हिंदी, इंग्रजी या चार भाषांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात येणार आहे. त्याला बालभारतीची मान्यताही असेल. प्रत्येक टॅबसाठी महापालिकेला करासह २० हजार ५३२ रुपयांचा खर्च येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी १९ हजार ४०१ टॅबची खरेदी केली जाणार आहे.

मात्र १०वीची परीक्षा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. मार्च महिन्यात १०वीच्या परीक्षा होणार असून आता पूर्वपरीक्षाही जवळ आली आहे. मनपाच्या कंत्राटातील अटीनुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांचे टॅब ६० दिवसांत आणि हिंदी, उर्दू माध्यमाचे टॅब ७५ दिवसांत पुरवायचे आहेत. तोपर्यंत दहावीच्या परीक्षाही संपणार असून हे टॅब आता सुट्टी काळात धुळखात पडणार आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा