पालिका शाळांमध्ये ‘नवा प्रयोग’

 Pali Hill
पालिका शाळांमध्ये ‘नवा प्रयोग’

सीएसटी - महापालिका शाळांमध्ये नवीन 143 विज्ञान प्रयोगशाळा सुरू करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोगांचं प्रात्यक्षिक करता यावं, यासाठी पालिकेनं नवा उपक्रम हाती घेतलाय. 2016-17 मध्ये पालिकेच्या 102 प्राथमिक आणि 41 माध्यमिक शाळांमध्ये नवीन विज्ञान प्रयोगशाळा निर्माण करण्यात येत आहेत. त्यासाठी लागणा-या साहित्यांची खरेदी प्रक्रिया पूर्ण झालीय. लवकरच हे साहित्य विज्ञान प्रयोगशाळेत उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिलीय.

Loading Comments