कायमस्वरुपी नोकरी द्या, संगणक शिक्षकांची मागणी

  Dadar (w)
  कायमस्वरुपी नोकरी द्या, संगणक शिक्षकांची मागणी
  मुंबई  -  

  माहिती, संप्रेषण आणि तंत्रज्ञान (Information, Communication and Technology) योजनेंतर्गत संगणक शिक्षकांना कायमस्वरुपी सेवेत रुजू करून घेतले जात नाही. त्यामुळे कायमस्वरुपी सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी संगणक शिक्षकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

  देशातील अनेक राज्यांनी माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान योजनेंतर्गत शिक्षकांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेतले. फक्त महाराष्ट्रातील शिक्षकांना अद्याप नोकरीत कायमस्वरुपी सामावून घेतलेले नाही. यासंदर्भात शिक्षकांनी विनोद तावडे यांची अनेकदा भेटही घेतली. दरवेळेस आश्वासन दिले जाते. मात्र, नोकरीत अद्याप सामावून घेतलेले नाही. याच शिक्षकांकडून शालांत परीक्षेसाठी परिक्षक म्हणून नेमले जाते. त्यांच्याकडून उत्तरपत्रिकाही तपासून घेतल्या जातात. पण त्यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्यास शिक्षण खाते तयार नाही. त्यामुळे या शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर तोडगा निघावा यासाठी शिक्षकांनी अखेर मंगळवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन या शिक्षकांना दिले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.