Advertisement

फी मागितल्यास शाळांवर होईल कारवाई, शिक्षणमंत्र्यांचे निर्देश

लाॅकडाऊनच्या काळात कुठल्याही शाळांनी विद्यार्थ्यांच्या आगामी शैक्षणिक वर्षाच्या फी चे पैसे पालकांकडून मागू नयेत असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

फी मागितल्यास शाळांवर होईल कारवाई, शिक्षणमंत्र्यांचे निर्देश
SHARES

लाॅकडाऊनच्या काळात कुठल्याही शाळांनी विद्यार्थ्यांच्या आगामी शैक्षणिक वर्षाच्या फी चे पैसे पालकांकडून मागू नयेत असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. तरीही काही शाळा फी मागत असल्याच्या तक्रारी पालकांकडून मिळत आहेत. त्यामुळे अशा शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत.  

यासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पालकांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात ३ मे पर्यंत संचारबंदी लागू आहे. मला सोशल मीडिया आणि फोनच्या माध्यमातून काही पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी मिळाल्या आहेत की त्यांच्या शाळांकडून लाॅकडाऊन असूनही त्यांच्याकडे फी ची मागणी करत आहेत.   

राज्यातील कोरोनाची आणि पालकांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था आणि शाळांना (माध्यमिक/उच्च माध्यमिक) एक परिपत्रक पाठवण्यात आलं आहे. लाॅकडाऊनच्या काळात कुठल्याही विद्यार्थ्यांकडून फी ची मागणी करण्यात येऊन नये, असं परिपत्रकात स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे.

तरीही कुठल्या शाळेकडून फी ची मागणी होत असल्यास विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी आपल्या जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे यासंबंधीची तक्रार नोंदवावी, असं त्यांना आवाहन करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा शिक्षण अधिकारी संबंधित शैक्षणिक संस्था वा शाळांना परिपत्रकाचं पालन करण्याचे निर्देश देतील तसंच न ऐकणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्यात येईल, असं गायकवाड यांनी स्पष्ट केलं.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा