Advertisement

म्हणून केली ‘स्पेशल टास्क फोर्स’ची स्थापना


म्हणून केली ‘स्पेशल टास्क फोर्स’ची स्थापना
SHARES

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय महाविद्यालयांत महत्त्वाकांक्षी प्रकल्प दिलेल्या मुदतीत पूर्ण होण्यासाठी ‘स्पेशल टास्क फोर्स’ची स्थापना करण्यात आली आहे. या स्पेशल टास्क फोर्सच्या माध्यमातून प्रकल्पांचं बांधकाम आणि अन्य प्रशासकीय मान्यता यांचा दरमहा आढावा घेण्यात येईल. याशिवाय त्याविषयीचा प्रगती अहवाल तयार करण्यात येणार आहे.


७ सदस्यांचा समावेश

या स्पेशल टास्क फोर्समध्ये अध्यक्षासंह ७ सदस्यांचा समावेश आहे. त्यात वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्य विभागाचे सचिव अध्यक्ष म्हणून असतील. तर, सदस्यांमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने, टाटा रुग्णालयाचे डॉ. कैलास शर्मा, मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, औरंगाबाद कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. कृष्णा कांबळे यांचा समावेश आहे.


‘स्पेशल टास्क फोर्स’साठी समितीची स्थापना

समितीच्या कार्यकक्षेत काही प्रमुख मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात संबंधित संस्थेचा शासनाला सादर करण्यात येणारा प्रस्ताव परिपूर्ण आणि आवश्यक कागदपत्रांसह आहे की नाही याची छाननी करणे. शासन स्तरावरुन सांगण्यात आलेल्या त्रुटी पूर्ततेबाबत दिलेल्या कालावधीत पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणे. शासनाकडून मान्यता दिल्यानंतर सर्व कामांसाठी मंजूर करण्यात आलेली अंदाजपत्रक रक्कम आणि निविदेच्या किंमतीची माहिती घेणे. बांधकामासाठी आर्थिक वर्षात खर्च होऊ शकेल इतक्या निधीची मागणी करणे. कामांसाठी उपलब्ध करुन दिलेल्या निधीचा विनियोग होतो की नाही ही बाब संबंधित बांधकाम स्थळास जाऊन तपासणे आणि वेळोवेळी प्रगतीचा आढावा शासनास सादर करणे बंधनकारक आहे या मुद्द्यांचा समावेश आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा