शेवटची गुणवत्ता यादी १ आॅगस्टला, दुसऱ्या यादीत १६,३३६ विद्यार्थ्यांना प्रवेश

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत ६९ हजार १७० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून १६ हजार ३३६ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचं कॉलेज मिळालं आहे.

SHARE

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत ६९ हजार १७० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून १६ हजार ३३६ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचं कॉलेज मिळालं आहे. अजून २० हजार ७८१ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असून दुसऱ्या यादीत नाव येऊनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जाहीर झाल्यानंतर ही संख्या आणखी वाढेल. या विद्यार्थ्यांसाठी १ ऑगस्टला शेवटची गुणवत्ता यादी जाहीर होईल. 

इनहाऊस, अल्पसंख्याक, मॅनेजमेंट, द्विलक्षी आणि पहिल्या गुणवत्ता यादीनंतर एकूण ९५ हजार ५२६ विद्यार्थ्यांना आतापर्यंत प्रवेश मिळाले आहेत. 

दुसऱ्या गुणवत्ता यादीत उपलब्ध १ लाख ३३ हजार २४५ जागांवर १ लाख ७ हजार ७८५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी ६९ हजार १७० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. दुसऱ्या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना २३ ते २५ जुलै, दुपारी ३ वाजेपर्यंत कॉलेजमध्ये प्रवेश घेता येईल. तर शेवटच्या गुणवत्ता यादीसाठी कॉलेज पसंतीक्रम बदलण्यासाठी विद्यार्थ्यांना २७ आणि २९ जुलैपर्यंत मुदत आहे.  

दुसऱ्या यादीतील प्रवेश

आर्ट्स- ५६५१

काॅमर्स- ४६,६४८

सायन्स- १६,४७१

एमसीव्हिसी- ४००

 

दुसऱ्या यादीचा कटऑफ

एचआर – कॉमर्स ९१.६०

केसी – आर्ट्स ८७, कॉमर्स ८९, सायन्स ८४.८०

जयहिंद – आर्ट्स ९०.८०, सायन्स ८४.८०

रुईया – आर्ट्स ९४, सायन्स ८८.४०

पोदार – कॉमर्स ९२.४०

रुपारेल – आर्ट्स ८५, कॉमर्स ८७, सायन्स ८६.८०

साठय़े – आर्ट्स ७, कॉमर्स ८४.६०, सायन्स ८२.२०

डहाणूकर – कॉमर्स ८७.२०

मिठीबाई – आर्ट्स ८५.६०, कॉमर्स ८७.२०, सायन्स ८२.२०

सेंट झेवियर्स – आर्ट्स ९३.४०, सायन्स ८२.८०

एनएम – कॉमर्स ९०.४०

फादर अॅग्नेल – कॉमर्स ८३.४०, सायन्स ९२



हेही वाचा-

प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची कटऑफ नव्वदीपार

प्रवेश प्रक्रिया नव्यानं राबवण्यात यावी, वैद्यकीय पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांची मागणी


संबंधित विषय
ताज्या बातम्या