Advertisement

आता शाळांमध्ये प्रत्येक विषयाचे ठरलेले तास घ्यावेच लागतील


आता शाळांमध्ये प्रत्येक विषयाचे ठरलेले तास घ्यावेच लागतील
SHARES

कार्यानुभव, आरोग्य, शारीरिक शिक्षण, कला अशा विषयांचं विद्यार्थ्यांना चांगलं आणि उत्तम शिक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 22 जून 2015 साली प्रगत शैक्षणिक योजना राबवण्याचे ठरवले होते. त्याची अंमलबजावणी 2017-18 या शैक्षणिक वर्षात करण्यात येणार आहे. या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते नववी या वर्गाकरता शासनाने तासिका ठरवल्या आहेत. 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे शासनाने ठरवले आहे. या निर्णयानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गासाठी एका आठवड्यात 45 तासिका होतील. मुख्याध्यापक आवश्यकतेनुसार तासिकांमध्ये बदल करू शकतात. पहिला तास हा 40 मिनिटांचा आणि पुढील तास 35 मिनिटांचे असतील.

तसेच येत्या शैक्षणिक वर्षापासून नववीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे नववी आणि दहावीसाठी काही बदल करण्यात आले आहेत.

1) इयत्ता नववीसाठी आयटीसी (माहीती संप्रेषण तंत्रज्ञान) हा विषय स्वतंत्र राहणार नाही. हा विषय इतर विषयांमध्ये समाविष्ट केला जाईल.
2) नववीसाठी सामान्य गणित हा विषय राहणार नाही. तर सगळ्यांसाठी बिजगणित आणि भूमिती ही पाठ्यपुस्तके असतील.
3) व्यक्तिमत्व विकास, कार्यानुभव, समाजसेवा आणि व्यवसाय मार्गदर्शन या विषयांऐवजी स्व-विकास आणि कला रसस्वाद या आशयाचे विषय असतील.
4) मराठी भाषेच्या नववीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी तृतीय भाषेऐवजी इंग्रजी प्रथम भाषा निवडण्याची सुविधा आहे.

असे असतील तास

इयत्ता पहिली ते दुसरी

विषय 
2017-18 पासून लागू तास
प्रथम भाषा
15
गणित
12
इंग्रजी
6
कार्यानुभव
4
कला
4
आरोग्य आणि शारीरिक शिक्षण
4
एकूण तास
45


इयत्ता तिसरी ते चौथी 

विषय2017-18 पासून लागू तास
प्रथम भाषा
12
इंग्रजी6
गणित8
परिसर अभ्यास(भाग 1 व 2)
9
कार्यानुभव
4

आरोग्य व शारिरिक शिक्षण
3
कला
3
एकूण तास
45


इयत्ता पाचवी

विषय2017-18 पासून लागू तास
प्रथम भाषा6
द्वितीय भाषा6
तृतीय भाषा6
गणित7
परिसर अभ्यास(भाग 1 व 2)
11
कार्यानुभव3
कला3
आरोग्य व शारिरिक शिक्षण
3
एकूण तास45

  

इयत्ता सहावी ते आठवी

विषय2017-18 पासून लागू तास
प्रथम भाषा6
द्वितीय भाषा6
तृतीय भाषा6
गणित7
विज्ञान7
सामाजिक शास्त्रे6
कार्यानुभव3
आरोग्य व शारीरिक शिक्षण 2
कला2
एकूण तास45
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा