चेंबूरमध्ये जीपीएफ संगणक प्रणालीचे उद्घाटन

 Chembur
चेंबूरमध्ये जीपीएफ संगणक प्रणालीचे उद्घाटन
चेंबूरमध्ये जीपीएफ संगणक प्रणालीचे उद्घाटन
See all

चेंबूर - मराठी भाषा दिनानिमित्त सोमवारी उत्तर मुंबई शिक्षण निरीक्षक कार्यालय येथे जीपीएफ संगणक प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. या वेळी उत्तर मुंबई विभागाचे शिक्षण निरीक्षक अनिल साबळे, शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष जयवंत पाटील हे उपस्थित होते.

जीपीएफ प्रणालीमुळे आता कुणालाही आपले पैसे कुठे गेले हे कळेल, ऑनलाईन जीपीएफ रिसीट काढता येईल, आपला पासवार्डीही यात सुरक्षिता राहील, सहाव्या वेतन आयोगाचा रेकॉर्डही यात जतन होणार आहे.

"एका विभागात सुरू झालेली ही प्रणाली लवकरच दक्षिण आणि पश्चिम विभागातही सुरू करण्यासाठी शिक्षक भारती पाठपुरावा करणार आहे," अशी माहिती शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह सुभाष मोरे यांनी दिली.

Loading Comments