Advertisement

सोमवारपासून सुरू होणार 'आयडॉल'च्या परीक्षा; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा


सोमवारपासून सुरू होणार 'आयडॉल'च्या परीक्षा; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
SHARES

तांत्रिक अडचणींमुळे परीक्षांमध्ये गोंधळ झाल्यानंतर आयडॉलच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानुसार, आता दूर व मुक्त शिक्षण अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) अंतिम वर्षांच्या परीक्षा सोमवारपासून (१९ ऑक्टोबर) टप्प्याटप्प्यानं सुरू करण्यात येणार आहे. तसंच, आयडॉलनं परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना वेळेवर लॉगइन आयडी, पासवर्ड व परीक्षेच्या लिंक मिळाल्या नाहीत. सायबर हल्ला झाल्याने तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचे कारण देत या परीक्षा १८ ऑक्टोबपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता टप्प्याटप्प्याने या परीक्षा १९ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येत असून २२ ऑक्टोबपर्यंत होणार आहेत.

सगळ्याच विद्यार्थ्यांची एकत्र परीक्षा घेण्याऐवजी गट करून परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. सुरुवातीला फेरपरीक्षा (बॅकलॉग) घेण्यात येणार असून त्याचे नियोजन विद्यापीठच करणार आहे. विद्यार्थिसंख्या कमी असल्यामुळे गूगल अर्जाच्या माध्यमातून या परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती मिळते.

बीएस्सी आयटी, टीवायबीएस्सी, एमएस्सी पार्ट २ या अभ्यासक्रमांच्या नियमित आणि फेरपरीक्षांचे तर बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी आणि एमसीएच्या फक्त फेरपरीक्षांचे वेळापत्रक आयडॉलकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या https://old.mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळावर परीक्षेचे वेळापत्रक उपलब्ध आहे. दरम्यान, परीक्षा घेण्याच्या कामासाठी नव्या कंपनीकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत. निविदा भरण्यासाठी शुक्रवापर्यंत मुदत देण्यात आली आहे. कंपनीची निवड झाली की सर्व तांत्रिक गोष्टींची चाचणी करून विद्यार्थिसंख्या अधिक असलेल्या परीक्षांचे नियोजन करण्यात येणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा