Advertisement

दहावीच्या कलचाचणीचा निकाल १५ मार्चला

दहावीच्या विद्यार्थ्यांची कल ओळखू शकणारी कलचाचणी घेण्यात येते. यानुसार यंदाही ही चाचणी घेण्यात आली असून येत्या १५ मार्चला या कलचाचणीचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

दहावीच्या कलचाचणीचा निकाल १५ मार्चला
SHARES

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी कलचाचणी घेण्यात आली होती. या कल चाचणीचा निकाल १५ मार्च रोजी जाहीर होणार असून विद्यार्थ्यांना १६ ते २२ मार्च दरम्यान परीक्षा केंद्रावर निकाल मिळणार आहेत.


कलचाचणी म्हणजे काय ?

दहावीनंतर प्रत्येक विद्यार्थी आपल्या करिअरची दिशा ठरवण्यासाठी वेगवेगळ्या तज्ज्ञांचा सल्ला घेत असतात. त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने २०१६ सालापासून कलचाचणी नावाचा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांची कल ओळखू शकणारी कलचाचणी घेण्यात येते. यानुसार यंदाही ही चाचणी घेण्यात आली असून येत्या १५ मार्चला या कलचाचणीचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. याबाबत सुचना नुकत्याच राज्य शिक्षण मंडळाने सर्व शाळांना दिले आहेत. 


परीक्षा झाल्यानंतर निकाल 

सध्या दहावीची परीक्षा सुरू असून या कलचाचणीच्या निकालाचा विद्यार्थ्यांवर कोणताही परिणाम होऊ यासाठी १६ ते २२ मार्च या कालावधीत विद्यार्थ्यांना कलचाचणी अहवाल देण्यात येणार आहे. हा अहवाल वाटून झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांचा वेळ जाऊ नये याची दक्षता प्रत्येक परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परंतु शाळेतील विद्यार्थी विविध परीक्षा केंद्रावर असल्याने परीक्षेदरम्यान शाळेतील कर्मचाऱ्यांना पाठवणे शक्य होणार नाही. तसेच निकाल मनासारखा लागला नाही, तर विद्यार्थ्यांच्या पुढील निकालावर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बोर्डाने परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल द्यावेत अशी मागणी मुख्याध्यापक संघटना करत आहेत. हेही वाचा -

तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मनसेचा आज १३ वा वर्धापन दिन, राज ठाकरेंच्या भाषणाकडं सर्वांचं लक्षसंबंधित विषय
Advertisement