Advertisement

१० वी, १२ वी च्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर


१० वी, १२ वी च्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
SHARES

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या वेळापत्रकानुसार २१ फेब्रुवारी २०१८ ते २० मार्च २०१८ या कालावधीत १२ वीची परीक्षा होणार आहे. तर १० वीच्या परीक्षेला १ मार्चपासून सुरुवात होईल.


सविस्तर वेळापत्रक या संकेतस्थळावर

  • विद्यार्थ्यांना १० वी आणि १२ वीचं वेळापत्रक सविस्तररित्या शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येईल. 
  • www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील वेळापत्रकच अंतिम वेळापत्रक असणार आहे.अफवांवर विश्वास ठेवू नका

मंडळाच्या संकेतस्थळावर आणि शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयात पाठवण्यात आलेलं वेळापत्रक हे अंतिम वेळापत्रक असेल. सोशल मीडिया, व्हॉट्सअॅपवर फिरणारे वेळापत्रक विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरू नये. परीक्षेला येण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरील वेळापत्रक पाहूनच परीक्षेला यावं. या परीक्षेदरम्यान उठणाऱ्या अफवांवर विद्यार्थी आणि पालकांनी विश्वास ठेऊ नये, असं आवाहन मंडळाकडून करण्यात आलं आहे.
'त्या' पेपरच्या वेळेत बदल

विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा यासाठी २ महिन्यांपूर्वी मंडळाने वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यानुसार १० वीच्या एका पेपरच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. १० वीचा ५ मार्चला होणारा व्यवसाय विषयाचा पेपर १७ मार्चला होणार आहे. १२ वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.


पेपर सुरू झाल्यानंतर प्रवेश नाही

गेल्यावर्षी पेपर सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे आधी तो व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला होता. असं पुन्हा घडू नये, यासठी परीक्षा सुरू झाल्यानंतर आलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळणार नाही. तसेच पेपर संपेपर्यंत बाहेर जाता येणार नाही. असा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा