Advertisement

HSC Result 2023 : बारावीचा निकाल जाहीर, कोकण विभाग नंबर वन

९१.२५% विद्यार्थी उत्तीर्ण, पुन्हा मुलींचे वर्चस्व

HSC Result 2023 : बारावीचा निकाल जाहीर, कोकण विभाग नंबर वन
SHARES

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल 91.35 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी 93. 73 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण  89.14 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा पाच टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 

Maharashtra HSC Result : मुंबईचा निकाल सर्वात कमी 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या  बारावीची परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. विभागनिहाय निकालाची टक्केवारी पाहता कोकण विभाग अव्वल स्थानी असून मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे. 

कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के लागला असून  मुंबईचा निकाला 88.13 टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष  शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला आहे.

राज्याचा निकाल 91.25 टक्के

राज्यात एकूण 14,16,371 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 12,92,468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे राज्याचा निकाल 91.25 टक्के आहे.  

पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या (रिपीटर)  निकालाची टक्केवारी- 44.33 टक्के

खाजगी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी- 82.39 टक्के

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी- 93.43 टक्के




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा