Advertisement

Maharashtra SSC Result 2022: निकालानंतर रिचेकिंग, रिव्हेल्युएशनसाठी कधी आणि कसा कराल अर्ज?

ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

Maharashtra SSC Result 2022: निकालानंतर रिचेकिंग, रिव्हेल्युएशनसाठी कधी आणि कसा कराल अर्ज?
SHARES

अखेर दहावीचा निकाल लागला आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याच्या तारखेत दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी सोमवार 20 जून ते बुधवार 29 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक राहील.

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी प्रति विषय 50 रुपये शुल्क आकारले जाईल. हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे जमा करावे लागतील.

ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. यासाठी http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर सर्व माहिती अटी शर्ती आणि सूचना देण्यात आलेल्या आहेत. या प्रक्रियेसाठीचे शुल्क ऑनलाईन पध्दतीनेच भरावे लागेल.

  • विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती म्णजेच फोटो कॉपी (Photo Copy) मागणीसाठी ई-मेलद्वारे, संकेतस्थळ किंवा पोस्ट यापैकी एका पर्यायाची निवड करता येईल.
  • विद्यार्थ्यांनी निवडलेल्या पर्यायानुसार त्यांना छायांकित प्रती उपलब्ध करून देण्यात येतील.
  • यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे सोमवार दिनांक 20 जून ते शनिवार 09 जुलैपर्यंत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा लागेल.
  • उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी प्रति विषय 400 रुपये शुल्क आकारले जाईल. हे शुल्क ऑनलाईन पध्दतीने जमा करावे लागेल.
  • उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.
  • छायांकित प्रत मिळालेल्या दिवसापासून त्यापुढील पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • पुनर्मूल्यांकनासाठी प्रती विषय 300 रुपये शुल्क आकारले जाईल.

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परिक्षेसाठी यावर्षी महाराष्ट्रातून १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थीनींनी परीक्षा दिली आहे. उद्या हा निकाल लागणार असून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.



हेही वाचा

राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के, कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा