Advertisement

MPSC ची परीक्षा ४ सप्टेंबरला, लोकसेवा आयोगाची घोषणा

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागानं परवानगी दिली आहे.

MPSC ची परीक्षा ४ सप्टेंबरला, लोकसेवा आयोगाची घोषणा
SHARES

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणारी दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परिक्षा आता ४ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे. एमपीएससीने याबाबतचं पत्रक काढलं आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दुय्यम सेवा 'अराजपत्रित गट ब' संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा ११ एप्रिल २०२१ रोजी होणार होती. त्यानंतर राज्य शासनाने परीक्षा ९ एप्रिल रोजी पुढे ढकलली होती .आता ही परीक्षा ४ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे, असं परिपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काढलं आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागानं परवानगी दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानं परीक्षा घेण्यास परवानगी दिल्यानं परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे

राज्यातील चार लाख परीक्षार्थी दोन वर्षांपासून या परीक्षेची वाट बघत होते. एमपीएससीने  संयुक्त परीक्षेसाठी आपत्ती व पुनर्वसन विभागाकडे ‘ना हरकत प्रमाणपत्र’साठी पत्रव्यवहार केला होता. राज्य सरकारनं ३ ऑगस्ट २०२१ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र पाठवून त्यांचा अभिप्राय कळवला होता. या अभिप्रायानुसार परीक्षा ४ सप्टेंबर रोजी आयोजीत करण्यात येईल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा