Advertisement

गतवर्षीच्या तुलनेत यंदा 'आयडॉल'च्या प्रवेशात घट

मुंबई विद्यापीठाच्या दूर आणि मुक्त अध्ययन केंद्रातील (आयडॉल) प्रवेशातही यंदा मोठी घट झाल्याची माहिती समोर येत आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा 'आयडॉल'च्या प्रवेशात घट
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या दूर आणि मुक्त अध्ययन केंद्रातील (आयडॉल) प्रवेशातही यंदा मोठी घट झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास ९ हजार प्रवेश कमी झाले आहेत. कोरोना प्रादुर्भावाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन दूर आणि मुक्त शिक्षण संस्थांना विद्यापीठ अनुदान आयोगाने यंदाही परवानगी दिली. त्यानुसार या शैक्षणिक वर्षांतील (२०२०-२१) जुलै सत्राची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबपर्यंत मुदत देण्यात आली होती.

जवळपास २ महिने ही प्रवेश प्रक्रिया होऊनही यंदा आयडॉलमधून अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षीपेक्षा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ९ हजारांनी घटली आहे. यंदा ५८ हजार २०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. गेल्या वर्षी ६७ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.

नोकरी करत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण आयडॉलमध्ये सर्वाधिक आहे. कला, वाणिज्य, विज्ञान पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये एमएस्सी गणित, माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र, एमसीए, एमकॉम, एमए हे अभ्यासक्रम आहेत. त्यातील एमकॉम आणि एमए अभ्यासक्रमांना अधिक प्रतिसाद असतो. मात्र, यंदा याच अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिलेला नाही.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा