जेईई अॅडव्हान्समध्ये मुंबईचा राहुल 20वा

  Mumbai
  जेईई अॅडव्हान्समध्ये मुंबईचा राहुल 20वा
  मुंबई  -  

  आयआयटीच्या अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला. या परीक्षेत पुण्याचा अक्षत चुग देशात दुसरा तर, राज्यात पहिला आला. मुंबईचा राहुल भारद्वाज हा 20 वा आहे.

  अक्षयला या परीक्षेत 366 पैकी 335 गुण मिळाले तर, राहुलला 366 पैकी 320 गुण मिळाले आहेत. 'जेईई अॅडव्हान्स'ची परीक्षा 21 मे रोजी घेण्यात आली होती. जेईई प्रवेश परीक्षा पास झालेल्यांपैकी पहिल्या दीड लाख विद्यार्थ्यांना अॅडव्हान्स परीक्षा देता येते. या परीक्षेसाठी देशभरातून 1 लाख 59 हजार 549 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 50,455 विद्यार्थी पास झाले आहेत. यामध्ये 43,318 मुले आणि 7,137 मुलींचा समावेश आहे.

  जेईई अॅडव्हान परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता चाचणीची (अॅप्टिट्यूड टेस्ट) ची नोंदणी 11 आणि 12 जूनला करता येणार असून 14 जून रोजी अॅप्टिट्यूड टेस्ट होणार आहे. याचा निकाल 18 जूनला लावण्यात येईल.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.