Advertisement

शासनाचा निषेध करण्यासाठी शिक्षकांचं मुंडण आंदोलन


शासनाचा निषेध करण्यासाठी शिक्षकांचं मुंडण आंदोलन
SHARES

विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने सोमवारपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी काही शिक्षकांनी निषेध म्हणून मुंडण करून घेतलं असून हा प्रकार रोखण्यासाठी आझाद मैदान पोलिसांनी हस्तक्षेप केला. 



'या' आहेत प्रमुख मागण्या

सर्व २० टक्के अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान मिळावं. त्याशिवाय मराठी शाळांना जाचक ठरणारा १९ सप्टेंबर २०१६ चा शासन निर्णय रद्द करावा आणि सर्व अघोषित शाळा निधीसह घोषित करा. या विनाअनुदानित संघर्ष कृति समितीच्या प्रमुख मागण्या आहेत.

यासह इतर विविध मागण्यांसाठी विनाअनुदानित शिक्षक आझाद मैदानात आंदोलनासाठी बसले आहेत. या शिक्षकांचा आवाज विधासभेत उचलण्यासाठी आता शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. कायम विनाअनुदानित संघर्ष कृति समितीच्या सदस्यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या प्रश्नी शिवसेना शिक्षकांची बाजू विधानसभेत लावून धरेल, असं आश्वासन दिलं.


संघर्ष कृति समितीचा इशारा

त्यांच्या आदेशावरून शिक्षक सेना अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर आणि आमदार मनीषा कायंदे यांनी आंदोलनातील शिक्षकांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले, अशी माहिती समितीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी दिली. या शिष्टमंडळात खंडेराव जगदाळे, संजय डावरे, जितेंद्र डोंगरे यांचाही समावेश आहे. त्याशिवाय सरकार मागण्यांवर ठोस निर्णय जाहीर करत नाही, तोवर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही विनाअनुदानित संघर्ष कृति समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा