Advertisement

रात्रशाळेतील शिक्षकांना पूर्ण वेतन कधी?

रात्रशाळेतच काम करणाऱ्या शिक्षकांना पूर्णवेळ शिक्षकांचा दर्जा मिळाला. मात्र, अद्याप त्यांना ती वेतनश्रेणी लागू झालेली नाही. यासंदर्भात शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांना पत्र लिहून रात्रशाळा शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.

रात्रशाळेतील शिक्षकांना पूर्ण वेतन कधी?
SHARES

रात्रशाळेतच काम करणाऱ्या शिक्षकांना पूर्णवेळ शिक्षकांचा दर्जा मिळाला. मात्र, अद्याप त्यांना ती वेतनश्रेणी लागू झालेली नाही. त्यामुळे रात्रशाळेत शिकवणारे मुंबईतील २९१ तर राज्यातील एकूण ५९८ शिक्षक हवालदिल झाले आहेत. यासंदर्भांत शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांना पत्र लिहून रात्रशाळा शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.


शासन निर्णयाचीही अंमलबजावणी नाही

राज्यात आत्तापर्यंत रात्रशाळांना अनेक अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आलं होतं. १७ मे २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार फक्त रात्रशाळेतच शिकविणाऱ्या शिक्षकांना नियमित केलं आहे. रात्र शाळांतील अर्धवेळ शिक्षकांना दिलासा देत पूर्णवेळ वेतन देण्यासंदर्भातील निर्णय शालेय विभागाने या जीआरच्या माध्यमातून जाहीर केला. प्रत्येक शाळेत बायोमेट्रीक हजेरी, ११ वर्षांपासून रात्रशाळेत प्रवेश, शिक्षकांना वैद्यकीय खर्चांची प्रतिपूर्ती, शिक्षकांना शालेय वेतन प्रणाली आणि अनुकंपा धोरण लागू होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.


रात्रशाळा शिक्षकांमध्ये असंतोष

रात्रशाळेतील शिक्षकांना पूर्णवेळेचा दर्जा न दिल्यामुळे हे सर्व शिक्षक नियमित पूर्णवेळ वेतनश्रेणी तसेच इतर सुविधांपासून वंचित आहेत. याबाबत शिक्षण विभागाशी अनेकदा पत्रव्यवहार करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने रात्रशाळा शिक्षकांमध्ये शिक्षण विभागाच्या विरोधात असंतोष पसरला आहे.

सहा महिने उलटून गेल्यावरसुद्धा पूर्ण वेळ वेतनश्रेणी, पेन्शन योजना लागू करण्याबाब कोणताही ठोस निर्णय शिक्षण विभाग घेत नसून टाळाटाळ करीत आहे. याबाबत शिक्षण विभागाने लवकरात लवकर निर्णय घेऊन रात्रशाळा शिक्षकांना पूर्णवेळ शिक्षकांचा दर्जा द्यावा आणि नियमित वेतनश्रेणीही मिळावी, अशी मागणी रात्रशाळा शिक्षकांकडून होत आहेे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा