Advertisement

ऑगस्टपासून महाविद्यालयांचे ऑनलाइन वर्ग सुरू होणार?

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २९ एप्रिलच्या सूचनेनुसार १ ऑगस्टपासून द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षांचे वर्ग सुरू होणं अपेक्षित आहे.

ऑगस्टपासून महाविद्यालयांचे ऑनलाइन वर्ग सुरू होणार?
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षण मंडळानं शाळा व कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यापासून शिक्षण मंडळानं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाला सुरूवात केली आहे. ऑनलाइनच्या माध्यामातून शाळांनी अभ्यासक्रमाला सुरूवात केली आहे. अशातच आता ऑगस्ट महिन्यापासून महाविद्यालयांचं ऑनलाइन वर्ग सुरू करण्यासाठी चाचपणी करण्यात येत असून विद्यापीठ अनुदान आयोगानं यापूर्वी दिलेल्या वेळापत्रकानुसार वर्ग सुरू करण्याबाबत उच्चशिक्षण विभागानं विद्यापीठ आणि महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत.

याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार मात्र विद्यापीठांवर सोपवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २९ एप्रिलच्या सूचनेनुसार १ ऑगस्टपासून द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षांचे वर्ग सुरू होणं अपेक्षित आहे. त्यानंतर आयोगानं ६ जुलै रोजी सुधारित सूचना दिल्या. मात्र, त्यात परीक्षांबाबत स्पष्टता करून पुढील वेळापत्रक स्वतंत्रपणं जाहीर करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत २९ एप्रिलच्या सूचना ग्राह्य धरून विद्यापीठं आणि महाविद्यालयांनी १ ऑगस्टपासून वर्ग सुरू करण्याची तयारी केली आहे.

ऑनलाइन शिक्षणाबाबत विद्यापीठं आणि महाविद्यालयांची तयारी किती आहे याचा आढावा उच्चशिक्षण विभागानं नुकताच घेतला. मुंबई विद्यापीठाशी संलग्न काही महाविद्यालयांनी ऑनलाइन शिक्षणाची यंत्रणा उभी केली आहे. काही महाविद्यालयांनी वर्ग सुरूही केले आहेत. शक्य तेथे ऑनलाइन वर्ग सुरू करण्यासाठी उच्चशिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. तशा सूचनाही महाविद्यालयांना दिल्या जात आहेत. असे असताना ऑनलाइन परीक्षा मात्र शक्य नसल्याची भूमिका विभागानं सातत्यानं घेतली आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठं स्वायत्त असल्यामुळं परीक्षांचा नाही तरी वेळापत्रक ठरवण्याचं स्वातंत्र्य विद्यापीठांना देण्यात आलं आहे.



हेही वाचा -

राज्यात ९८९५ कोरोना रुग्णांची दिवसभरात नोंद, पाहा तुमच्या भागातील रुग्णांची संख्या किती

मुंबईत कोरोनाचे १२५७ नवे रुग्ण, ५५ जणांचा दिवसभरात मृत्यू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा