SHARE

नरिमन पॉइंट - दहावी आणि बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी आधी परीक्षेचा फॉर्म भरावा, पैसे भरण्याची मुदत आम्ही वाढवू अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलीय.

पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द झाल्यामुळे, परीक्षा फी भरण्यासाठी अडचण येत होती. याबाबतची तक्रार 10 वी, 12 वीच्या परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली होती.
कोणत्याही विद्यार्थ्यांना नोटांच्या अडचणींमुळे परीक्षेला बसता येणार नाही असं होणार नसल्याचं तावडेंनी स्पष्ट केलंय. विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने घेण्यात आलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय असून या मुळे लाखो विदयार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या