Advertisement

'सेल्फी' शिक्षणाला तूर्तास स्थगिती


'सेल्फी' शिक्षणाला तूर्तास स्थगिती
SHARES

मुंबई - काही दिवसांपूर्वी शाळाबाह्य मुलांच्या उपस्थितीसाठी शिक्षण विभागानं घेतलेला सेल्फी शिक्षणाबाबतचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल केल्यानंतर त्यांची उपस्थिती नियमित राहावी आणि कोणते विद्यार्थी उपस्थित नाहीत याचा शोध घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी सेल्फी काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये शिक्षकांना दररोज विद्यार्थ्यांसोबतचा सेल्फी पटसंख्येच्या पुराव्यासाठी काढायला सांगण्यात आले होते. मात्र याची अंमलबजावणी जिल्हा आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं केली. शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी असलेला निर्णय काही अधिकाऱ्यांनी सरसकट सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू केला. संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी लवकरच एकत्र बैठक घेऊन सेल्फी निर्णय केवळ शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी कसा अंमलात आणावा याबाबत अधिकाऱ्यांना प्रशिक्षित केलं जाणार असून तोपर्यंत या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे, असं विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा