Advertisement

ममता यांच्याशी मी फुटबॉलवर चर्चा केली: आदित्य ठाकरे

शिवसेनेने शुक्रवारी मुलुंड मधील कालिदास नाट्यगृहात आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी www.shivsenatopscorer.com या नावाची वेबसाईट लॉन्च केली.

ममता यांच्याशी मी फुटबॉलवर चर्चा केली: आदित्य ठाकरे
SHARES

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यात काय चर्चा झाली हे अजून गुलदस्त्यात असताना 'मी तर त्यांच्यासोबत फुटबाॅलवर चर्चा केली', असं वक्तव्य युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी मुलुंड येथील एका कार्यक्रमात केलं.


विद्यार्थ्यांसाठी वेबसाईट लाॅन्च

शिवसेनेने शुक्रवारी मुलुंड मधील कालिदास नाट्यगृहात आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी www.shivsenatopscorer.com या नावाची वेबसाईट लॉन्च केली. या वेबसाईटवर आठवी ते दहावी इयत्तेचा सोपा अभ्यासक्रम असेल. तर डिसेंबरपर्यंत पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी देखील असाच अभ्यासक्रम वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


काय आहे वेबसाईटवर?

या वेबसाईट्वारे विध्यार्थ्यांना 'प्रोमो कोड'च्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने अभ्यास समजावून घेता येईल. या वेळी आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधत त्यांना प्रोमो कोडचं वाटप केलं.


वेबसाईटची वैशिष्ट्ये:

  • वेबसाईट हिंदी, मराठी, इंग्लिश आणि सेमी इंग्लिश या भाषांमध्ये असेल
  • आठवी ते दहावीच्या अभ्यासक्रमाची सोप्या पद्धतीने मांडणी
  • झालेला अभ्यास तपासण्यासाठी ऑनलाईन परीक्षेची सोय
  • मेल आयडीवर मेल करून विद्यार्थ्यांना शंका मांडता येतील



हेही वाचा-

वेबसाईटवरून लिंकच गायब! परीक्षा अर्ज भरायचे तरी कुठे?

धक्कादायक! ३,७०० प्राध्यापकांनी एकही उत्तरपत्रिका तपासली नाही!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा