• रायन इंटरनॅशनलचा वार्षिक 'स्पोर्ट डे'
SHARE

चेंबूर - रायन इंटरनॅशनल शाळेचा वार्षिक 'स्पोर्ट्स डे' मंगळवारी चेंबूरच्या आरसीएफ मैदानात पार पडला. दरवर्षी जानेवारी महिन्यात या शाळेकडून स्पोर्ट्स डे साजरा करण्यात येतो. त्यानुसार यावर्षी मंगळवारी हा कार्यक्रम याठिकाणी घेण्यात आला. यामध्ये पहिली ते दहावी इयत्तेमधील तीनशे मुलांनी सहभाग घेतला होता. धावणे, क्रिकेट, बास्केट बॉल, फुटबॉल अशा प्रकारे विविध स्पर्धा याठिकाणी घेण्यात आल्या. या स्पर्धेमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेत पाठवण्यात येणार असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका फिलोमिना यांनी दिली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या