10-12 वीच्या फेरपरीक्षांचे प्रवेशपत्र मिळणार ऑनलाईन

 Mumbai
10-12 वीच्या फेरपरीक्षांचे प्रवेशपत्र मिळणार ऑनलाईन
Mumbai  -  

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीची परिक्षा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै-ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहे.

या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेशपत्र मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून हे प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेता येतील.

फेब्रुवारी- मार्च महिन्यात दहावी- बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात परीक्षा द्यावी लागत होती.

मात्र, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून जुलै-ऑगस्ट महिन्यात त्यांची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. यावर्षी 12 वीची फेरपरीक्षा 11 जुलैपैसून सुरू होईल.

जुलै-ऑगस्ट महिन्यांत होणाऱ्या परीक्षांसाठी मंडळाने छापील प्रवेशपत्र देणार नसल्याचे जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया संपली असून विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करुन घ्यावीत, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.
हे देखील वाचा - 

दहावीची पुरवणी परीक्षा 14 जुलैपासून


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments