दहावीचा निकाल पुढच्या आठवड्यात

  Mumbai
  दहावीचा निकाल पुढच्या आठवड्यात
  मुंबई  -  

  दहावीच्या निकालाबाबत अनेक तारखा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे नेमका दहावीचा निकाल कधी लागणार? याबाबत पालक आणि विद्यार्थांमध्ये कमालीचा संभ्रम आहे. निकालाच्या तारखेवरून निर्माण झालेला गाेंधळ थांबविण्याच्या उद्देशाने शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल पुढच्या आठवड्यात लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे निकालाबाबतच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

  या आठवड्यात दहावीचा निकाल लागेल अशी अफवा साेशल मीडियावर व्हायरल होत होती. याबाबतच्या अनेक तारखाही व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावर दहावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होईल, असे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मेमाणे यांनी स्पष्ट केले आहे.

  गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर अनेक तारखा येत असल्यामुळे पालक आणि विद्यार्थी गोंधळलेले होते. कुणीही अफवांवर विश्वास ठोऊ नका. पुढील आठवड्यात निकाल जाहीर करण्यात येईल.
  - गंगाधर मेमाणे, अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.