Advertisement

सेंट झेवियर्सला मिळाले मराठमोळे प्राचार्य

सेंट झेवियर्सला राजेंद्र शिंदे हे पहिले मराठमोळे प्राचार्य लाभले आहेत. १५० वर्षांच्या इतिहासात सेंट झेवियर्समध्ये पहिल्यांदाच बिगरख्रिस्ती प्राचार्यांची नियुक्ती झाली आहे. येत्या १ सप्टेंबरपासून राजेंद्र शिंदे प्राचार्यपदाचा कार्यभार स्वीकारणार असून शिंदे यांच्या रुपाने एक मराठी प्राचार्य संस्थेला लाभले आहेत.

सेंट झेवियर्सला मिळाले मराठमोळे प्राचार्य
SHARES

दक्षिण मुंबईतील नामांकित सेंट झेवियर्सला राजेंद्र शिंदे हे पहिले मराठमोळे प्राचार्य लाभले आहेत. १५० वर्षांच्या इतिहासात सेंट झेवियर्समध्ये पहिल्यांदाच बिगरख्रिस्ती प्राचार्यांची नियुक्ती झाली आहे. येत्या १ सप्टेंबरपासून राजेंद्र शिंदे प्राचार्यपदाचा कार्यभार स्वीकारणार असून शिंदे यांच्या रुपाने एक मराठी प्राचार्य संस्थेला लाभले आहेत.


राजेंद्र शिंदेंचा अल्पपरिचय

राजेंद्र शिंदे हे मूळ वणी या गावचे असून त्यांचे वडील स्टेशन मास्तर होते. एका लहानशा गावात जन्म झालेल्या राजेंद्र शिंदे यांच्या घरची परिस्थिती अंत्यत हलाखीची होती. वडील श्रीरामपूरला स्टेशन मास्तर असताना पुणतांबा या गावातल्या सरकारी शाळेत त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण झालं. त्यानंतर त्यांच्यापुढे श्रीरामपूर, नाशिक, किंवा मुंबई असे तीन पर्याय उपलब्ध होते. मुंबईचं आकर्षण असल्यानं त्यांनी पुढील शिक्षणासाठी मुंबईचा पर्याय निवडला. त्यानंतर त्यांनी सेंट झेवियर्स महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या वांद्र्यातील सेंट स्टेनिसलॉसमध्ये १९७८ मध्ये शिक्षण सुरू केलं.


३० वर्ष या पदावर केलं काम

१९८० मध्ये बारावीनंतर वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, आणि रसायनशास्त्र हे तीन विषय घेऊन ते प्रथमवर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी दाखल झाले. १९८३ मध्ये वनस्पतीशास्त्र या विषयातून पदवीपर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर ते झेवियर्समध्येच 'ब्लॅटर हार्बेरियम' या विभागात क्युरेटर म्हणून रुजू झाले. याच दरम्यान त्यांनी पदव्युत्तर आणि पीएचडी हे शिक्षणही पूर्ण केलं. त्याचवेळी सुट्टीकालीन व्याख्याते या पदाची जबाबदारी पडली. त्यांनी ३० वर्ष या पदावर काम केलं.

३० वर्षानंतर त्यांनी एका निवृत्त प्राध्यापकाच्या जागेवर अर्ज दाखल केला आणि व्याख्याता म्हणून रूजू झाले. त्यानंतर पुढे महाविद्यालयानं प्रशासनाने त्यांच्यावर परीक्षा विभाग, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी समन्वय विभाग, उप-प्राचार्य यांसारख्या विविध पदांचीही जबाबदारी सोपवली.


कशी झाली प्राचार्यपदावर नियुक्ती?

१९८० साली विद्यार्थीदशेपासून ते आतापर्यंत त्यांनी झेवियर्स महाविद्यालयात व्याख्याते, परीक्षा विभाग, आंतरराष्ट्रीय विभाग समन्वय विभाग, उप-प्राचार्य म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. काही महिन्यांपूर्वी झेवियर्समध्ये प्राचार्यपदासाठीची जाहिरात निघाली होती. त्यासाठी त्यांनी रीतसर अर्ज दाखल केला आणि नुकत्याच झालेल्या मुलाखतीत प्राचार्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

झेवियर्स महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राध्यापकांमध्ये राजेंद्र शिंदे हे सर्वात अनुभवी आहेत. वनस्पतीशास्त्र विषयात पीएचडी केलेले शिंदे गेल्या अनेक वर्षापासून येथे विभागप्रमुख म्हणून काम पाहत आहे. गेले ३८ वर्ष सेंट झेवियर्सची राजेंद्र शिंदे यांचा घनिष्ठ संबंध राहिला असून आता ते या महाविद्यालयाचे २४ वे प्राचार्य म्हणून येत्या १ सप्टेंबरला पदभार स्वीकारणार आहेत.


हेही वाचा - 

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियत पुन्हा गोंधळ, तिसरी यादी पुढे ढकलली

अभ्यासक्रम नवा, प्रश्न जुने! एलएलबीच्या प्रश्नपत्रिकेत पुन्हा घोळ!

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा