Advertisement

विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांना केलं अभिवादन


विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांना केलं अभिवादन
SHARES

घाटला गांव - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चेंबूरच्या घाटला खारदेवनगरमधील आयडियल एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इरा नाइट हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये बाबासाहेबांना अभिवादन केलं.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. 424 चे सरचिटणीस चंद्रकांत जाधव, कुणबी समाजोन्नती संघ चेंबूर - ट्रॉम्बे शाखेचे अध्यक्ष भास्कर चव्हाण यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर भाषणं केली. तर रात्रशाळेतील विद्यार्थ्यांनी आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करणे हीच खरी बाबासाहेबांना आदरांजली ठरेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यध्यापक चंद्रकांत म्हात्रे होते. या वेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तथा मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement