Advertisement

एनसीसीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा


एनसीसीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा
SHARES

प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे राज्याचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी जाणाऱ्या एनसीसी तसेच एनएसएसच्या विद्यार्थ्यांना अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी यासाठी खर्च करावा लागतो. या कालावधीत विद्यार्थ्यांना होणाऱ्या विविध परीक्षांना मुकावं लागत असून अशावेळी त्यांचं शैक्षणिक नुकसान होतं. हे नुकसान होऊ नये यासाठी या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाईल, असं आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलं.


सरावासाठी १८ शाळा उपलब्ध

आयएनटी एकांकीका स्पर्धेच्या अंतिम फेरीदरम्यान गुरुवारी तावडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या स्पर्धेतील नाटकांच्या सरावासाठी जागा मिळत नसल्याची तक्रार दिग्दर्शक विनोद गायकर यांनी केली होती. दरम्यान यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असून याला काही सामाजिक संस्थांनी विरोध केला होता.
सद्यस्थितीत एकांकिकांच्या सरावासाठी १८ शाळा उपलब्ध केल्या असून भविष्यात आणखी शाळा उपलब्ध करून दिल्या जातील', असंही तावडे यांनी सांगितलं. तर, अनेक कॉलेजे एकांकीका स्पर्धांना विद्यार्थ्यांना पाठवताना अडवणूक करत असल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. यावर उत्तर देताना तावडे म्हणाले की, या संदर्भात येत्या सोमवारी कॉलेजांना पत्र पाठवून नामांकीत स्पर्धांना पाठवण्यासाठी विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये, असं सांगण्यात येईल.


सकारात्मक प्रतिसाद

विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अनेक एकांकीका येतात. त्यातील काही जिंकतात, त्यांचे दोन दिवस कौतुक होते आणि पुढे काही होत नाही. यामुळे अशा विजेत्या एकांकीकांचा महोत्सव करावा, अशी सूचना यावेळी करण्यात आली. याला तावडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत असा महोत्सव भरवण्यास सरकार तयार असून त्यासाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून दिला जाईल, असं सांगितले. तर, कलाकारांची एक समिती नेमून त्यांनी कोणत्या एकांकीकांचा यात समावेश करण्याचं सुचवावं; त्यानुसार आयोजन केलं जाईल, असंही ते म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा