Advertisement

१० वर्षांपासून हा अवलिया देतोय मोफत शिक्षण, सोनू सूदला भेटण्यासाठी मुंबईत दाखल

कोरोना काळात लोकांना मदत करून सोनू सूदनं लोकांच्या हृदयात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

१० वर्षांपासून हा अवलिया देतोय मोफत शिक्षण, सोनू सूदला भेटण्यासाठी मुंबईत दाखल
SHARES

राजस्थानातील कोटा इथं गेल्या ७ वर्षांपासून विनामूल्य गरजू मुलांना शिकवणारे सतीश पटेल हे अभिनेता सोनू सूदला भेटण्यासाठी मुंबईत आले आहेत. सतीश पटेल हे गेल्या १० वर्षांपासून गरजू मुलांना विनामूल्य शिक्षण देत आहेत.

पहिल्या ३ वर्षात त्यांनी दिल्लीत गरीब मुलांना विनामूल्य शिकवलं. त्यानंतर ते कोटा इथं गेले. कोटा इथं पोहोचल्यानंतरही ७ वर्षांपासून ते मुलांना मोफत शिकवत आहेत. सतीश शालेय विद्यार्थ्यांना तसंच आयआयटी आणि एनईईटी सारख्या परीक्षांच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षण देत आहेत.

सतीशनं आपले बीटेक पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी दिल्ली आणि कोटामध्ये विनामूल्य मुलांना शिकवण्यास सुरुवात केली. वास्तविक, सतीश हे अत्यंत गरीब कुटुंबातले आहेत. म्हणूनच त्यांनी गरीब आणि गरजू मुलांना मोफत शिक्षण देण्याचं ठरवलं.

सतीशचा असा विश्वास आहे की, देशात मूलभूत शिक्षण आवश्यक आहे आणि प्रत्येक मुलानं ते घेतलं पाहिजे. आतापर्यंत सतीशनं ५०० हून अधिक मुलांना विनामूल्य शिकवलं आहे.

सतीश म्हणतात की, "मी दारिद्र्य अगदी जवळून पाहिलं आहे. मी कठीण परिस्थितीत माझे अभ्यास पूर्ण केला आहे. म्हणून मी प्रयत्न करतो की मुलाचे आयुष्य गरीब किंवा श्रीमंत असले तरी प्रत्येकाला शिक्षण उपलब्ध व्हावे. माझ्या मते शिक्षणाचे महत्त्व आहे. शिक्षणाच्या जोरावर केवळ भारत आपले भविष्य तयार करू शकतो. जर कुटुंबातील एखादा तरी सुशिक्षित झाला तर संपूर्ण कुटुंबाला शिक्षणाचा प्रकाश मिळेल.

अभिनेता सोनू सूदला भेटण्यासाठी सतीश मुंबईला आले आहेत. कोरोना काळात लोकांना मदत करून सोनू सूदनं लोकांच्या हृदयात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोनू सूद यांनी अलीकडेच गरीब मुलांचे शिक्षण, आयएएस आणि सीए विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण सुरू केलं आहे.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा