Advertisement

दहशतवाद्यांकडून पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी

ATS च्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

दहशतवाद्यांकडून पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी
Representative photo प्रातिनिधिक छायाचित्र
SHARES

पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याचे दहशतवादविरोधी पथकाने न्यायालयात सादर केलेल्या एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. कोथरूड पोलिसांनी नाकाबंदीत दोन दहशतवाद्यांना पकडले होते. त्यांच्याकडून या माहितीचा खुलासा करण्यात आला आहे.  

तसेच आरोपींविरुद्ध दाखल गुन्ह्यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत कलमात वाढ करण्यात आली आहे.

दोन्ही दहशतवाद्यांची पोलिस कोठडी संपत असल्याने दहशतवाद विरोधी पथकाने त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. त्यावेळी सत्र न्यायाधीश एस.व्ही. कचरे यांच्या न्यायालयाने त्यांना ५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

तपासादरम्यान दहशतवाद विरोधी पथकाने दोन्ही आरोपींच्या घराची झडती घेतली असता संशयास्पद वस्तू सापडल्या. त्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह पांढरी पावडर आढळून आली. स्फोटक वेफर डिटेक्टरमध्ये पावडर स्फोटक असल्याचे उघड झाले. तसेच पोलीस श्वान पथकानेही याबाबत सकारात्मक अहवाल दिला आहे. ही पावडर तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आली असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे.

  • ISIS शी संलग्न अल सुफा संघटनेच्या विचारसरणीचे अनुयायी
  • पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात दहशतवाद्यांकडून बॉम्ब चाचणी
  • दहशतवाद्यांकडून जप्त केलेली पावडर स्फोटक होती
  • देशविरोधी कारवाया करण्याचा हेतू पेन ड्राइव्हवरून उघड झाला
  • दोघेही ISIS च्या अल सुफा संघटनेशी संबंधित असल्याची माहिती आहे
  • पेन ड्राईव्हच्या माहितीचा 436 पानांचा तपास अहवाल न्यायालयात



हेही वाचा

सीमा हैदरवरुन मुंबई पोलिसांना फोन, 26/11 स्टाईल हल्ल्याची धमकी

...तर तुमचा परवाना रद्द होऊ शकतो, नवीन नियम लागू होण्याची शक्यता

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा