Advertisement

२०२० मध्ये 'या' १० वेब सिरीज गाजल्या, तुम्ही पाहिल्या की नाही?

सध्याचा जमाना वेब सीरिजचा आहे. तीन तासांत जी गोष्ट मोठया पडद्यावर मांडणं शक्य नाही, असे विषय वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. ख्रिसमसच्या सुट्टीत तुम्ही या वेबसिरीजचा आनंद घेऊ शकता.

SHARES
01/10
२०२० मध्ये 'या' १० वेब सिरीज गाजल्या, तुम्ही पाहिल्या की नाही?
स्कॅम १९९२ ९० च्या दशकातील स्टॉकब्रोकर हर्षद मेहता यांच्या जीवनावर आधारीत ही सिरीज आहे. सीरिजची कथा दिग्दर्शक हंसल मेहता यांनी खूप सुंदर पद्धतीनं मांडली आहे. ही वेब मालिका तुम्ही SonyLiv या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
02/10
२०२० मध्ये 'या' १० वेब सिरीज गाजल्या, तुम्ही पाहिल्या की नाही?
स्पेशल ऑप्स भारतीय हेरगिरीवर ही सिरीज आधारीत असून १७ मार्च २०२० ला ही प्रदर्शित झाली. डिस्नी हॉटस्टारवर ही सिरीज पाहता येईल. के.के.मेनन याची प्रमुख भूमिका यात आहे. इंग्लिश, मराठी, तमिळ, हिंदी अशा बऱ्याच भाषांमध्ये पाहता येईल.
03/10
२०२० मध्ये 'या' १० वेब सिरीज गाजल्या, तुम्ही पाहिल्या की नाही?
असुर असुर ही वेब मालिका सत्य घटनेवर अधारीत असून क्राइम आणि थ्रिलरने ओतप्रेत भरलेली आहे. अर्शद वारसीने यामध्ये अप्रतिम अभिनय केला आहे. ही वेब सीरीज तुम्हाला वूट (Voot) वर पाहता येईल.
04/10
२०२० मध्ये 'या' १० वेब सिरीज गाजल्या, तुम्ही पाहिल्या की नाही?
पंचायत तुम्हाला मारामारीच्या आणि थ्रीलर वेब सिरीज पाहून कंटाळा आला आहे? मग तुम्ही पंचायत ही वेब सिरीज पाहू शकता. उत्तर प्रदेशमधल्या एका गावातील पंचायतवर ही सिरीज आधारीत आहे. MBA झालेला एक तरुण पंचायत ऑफिसमध्ये सचिव पदी नियुक्त होते. गावातील समस्या पाहून तो हैराण होतो. अमेझॉन प्राईम व्हिडिओवर ही सिरीज पाहू शकता.
05/10
२०२० मध्ये 'या' १० वेब सिरीज गाजल्या, तुम्ही पाहिल्या की नाही?
पाताल लोक पाताल लोक ही कथा एका घटनेच्या पोलीस तपाससंदर्भातली आहे. सुरूवातीला साधी केस असेल अशी वाटणारी कथा क्राइमच्या दुनियेतील अनेक धागेदोरे उलगडते. ही वेब मालिका तुम्ही प्राइम व्हिडियो या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
06/10
२०२० मध्ये 'या' १० वेब सिरीज गाजल्या, तुम्ही पाहिल्या की नाही?
आर्या सुष्मिता सेन यांनी या मालिकेत दमदार अभिनय साकारला असून त्यांची ही पहिलीच वेब मालिका आहे. ही मालिकेची पटकथा पेनोझा या डच नाटकावर अधारित आहे. ही वेब सीरीज तुम्हाला हॉटस्टारवर पाहता येईल.
07/10
२०२० मध्ये 'या' १० वेब सिरीज गाजल्या, तुम्ही पाहिल्या की नाही?
मिर्जापूर २ मिर्जापूर २ या वेब सीरीजचे फॅन्स गेल्या एक वर्षभरापासून या सीरीजची वाट पाहत होते. याची कथा थ्रिलर असून शेवटपर्यंत सस्पेन्स कायम ठेवला आहे. ही वेब सिरीज तुम्ही प्राइम व्हिडियो या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
08/10
२०२० मध्ये 'या' १० वेब सिरीज गाजल्या, तुम्ही पाहिल्या की नाही?
बंदिश बँडीट्स या वेब सिरीजनं आयएमडीबीच्या यादीत चौथं स्थान पटकावलं आहे. ही सिरीजला दर्शकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. बंदिश बँडीट्सची कथा दोन गायकांची असून दर्शकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात या मालिकेला यश आलं आहे. ही सिरीज प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
09/10
२०२० मध्ये 'या' १० वेब सिरीज गाजल्या, तुम्ही पाहिल्या की नाही?
अभय २ अभय ही वेब सिरीज क्राइम, थ्रिलर आणि सस्पेन्सने परिपूर्ण आहे. याची कथा एका क्राइम कादंबरीवर अधारित आहे. ही सिरीज ZEE5 वर पाहू शकता.
10/10
२०२० मध्ये 'या' १० वेब सिरीज गाजल्या, तुम्ही पाहिल्या की नाही?
हाई ही वेब सिरीज तुम्हाला नशेच्या दुनियेची सैर करवून आणते. नशेच्या बाजारात होणाऱ्या घडामोडी, खून, राजकारण, जीवघेणी स्पर्धा असं एकंदरीत सर्व घटकांना स्पर्श करणारी याची कथा आहे. तुम्ही ही वेब मालिका एमएक्स व्हिडिओवर पाहू शकता.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा