चलती का नाम गाडी

मुंबई - बाबू समजो इशारे, हॉरन पुकारे, पम... पम... पम... यहा चलती को गाडी कहते है प्यारे, पम... पम... पम... अभिनेता आणि गीतकार किशोर कुमार यांचं हे गाणं तुम्हाला आठवतय ना ? 1958 साली आलेल्या चलती का नाम गाडी या चित्रपटातील हे गाणं... गाण्यांसोबतच चित्रपटही तेवढाच गाजला... 60 वर्षानंतर तेच मॅजिक पण वेगळ्या रूपात पुन्हा प्रेक्षकांना अनुभवता येणाराय. सलाम बॉम्बे फाऊंडेशन या चित्रपटावर आधारीत नाटक प्रेक्षकांसमोर घेऊन येतंय. गायन शान पण या प्रोजेक्टमध्ये सहभागी आहेत. पाच नोव्हेंबरला नरिमन पॉईंट इथल्या वाईबी चव्हाण ऑडिटोरीयममध्ये या नाटकाचा पहिला शो आयोजित करण्यात आलाय. 

Loading Comments