Advertisement

'राजेश खन्‍ना यांचा मेणाचा पुतळा उभारा'


'राजेश खन्‍ना यांचा मेणाचा पुतळा उभारा'
SHARES

मुंबई - 70 च्या दशकातले सुपरस्टार राजेश खन्ना आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्या चाहत्यांची संख्या किंचीतही कमी झालेली दिसत नाही. राजेश खन्ना यांचा मेणाचा पुतळा दिल्लीच्या मदाम तुसॉं येथे उभारला जावा अशी मागणी त्यांच्या चाहत्यांनी केली आहे. 
सुपरस्टार राजेश खन्ना यांनी भारतीय सिनेमात प्रभावशाली कारकीर्द गाजवली. त्याची माहिती नवीन पिढीला होणं गरजेचं आहे. हिंदी सिनेसृष्टीत सुपरस्टार असलेल्या राजेश खन्ना यांनी 163 चित्रपटांत मुख्य नायकाची भूमिका वटवली. त्यांनी 1969 ते 1972 च्या दरम्यान लागोपाठ 15 हिट सिनेमे दिले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा