सलमान म्हणतो 'तुझ्यासाठी कायपण'!

 Mumbai
सलमान म्हणतो 'तुझ्यासाठी कायपण'!

मुंबई - 'खुशनसीब होते है वो जिनकी फॅमेली होती है,' हा प्रेम रतन धन पायो चित्रपटातील हा डायलॉग तुम्हाला आठवतोय ना? हा डायलॉग भाईजान सलमाख खानवर अगदी सूट होतो. भाईजानचा भाचा आहिलचा पहिला वाढदिवस दमन येथे धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.

या वेळी सलमानची पूर्ण फॅमेली मालदीवमध्ये धमाल, मस्ती करत होती. पण या सर्वात गायब होता तो सलमान खान. भाईजान व्यस्त होता तो साता समुद्रापार ऑस्ट्रियात 'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये. भाच्याचा पहिला वाढदिवस आणि मामूजान मिस करेल? हे कसे काय शक्य आहे? मामूजानने फ्लाईट पकडली आणि 22 तासांचा प्रवास करत मालदीव गाठले. त्याच्यासोबत त्याची कथित गर्लफ्रेंड लुलीयाही होती. 

विशेष म्हणजे मलायका अरोरा खान सुद्धा या वेळी उपस्थित होती. अरबाज खान आणि मलायका यांच्यात मतभेद असले तरी आपल्या मुलांसाठी आणि फॅमेलीसाठी ते एकत्र येतात. 

एकूणच सलमानचे पूर्ण 'खान'दान वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवमध्ये उपस्थित होते.

Loading Comments