महालक्ष्मीचं तेजस्वी रूप पाहिलं का?

आज सगळीकडे नवरात्रीची धूम आहे. देवीचे भक्तगण नऊ रंगांमध्ये न्हाऊन निघाले असताना एक मराठमोळी अभिनेत्री मात्र देवीच्या विविध रूपांमध्ये दर्शन देत आहे. त्यामुळं भक्तांना मात्र आपल्या आवडत्या देवीचं नव्या रूपात दर्शन घडत आहे.

  • महालक्ष्मीचं तेजस्वी रूप पाहिलं का?
  • महालक्ष्मीचं तेजस्वी रूप पाहिलं का?
  • महालक्ष्मीचं तेजस्वी रूप पाहिलं का?
  • महालक्ष्मीचं तेजस्वी रूप पाहिलं का?
SHARE

आज सगळीकडे नवरात्रीची धूम आहे. देवीचे भक्तगण नऊ रंगांमध्ये न्हाऊन निघाले असताना एक मराठमोळी अभिनेत्री मात्र देवीच्या विविध रूपांमध्ये दर्शन देत आहे. त्यामुळं भक्तांना मात्र आपल्या आवडत्या देवीचं नव्या रूपात दर्शन घडत आहे.

अभिनेत्री तेजस्विनी पंडीतनं नेहमीच प्रवाहापेक्षा हटके भूमिका साकारत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. कधी खलनायिकेच्या, तर कधी नायिकेच्या भूमिकेत आपले कलागुण दाखवले आहेत. अभिनयाखेरीजही आपली आवड-निवड जोपासत तिनं फॅशन डिझायनिंगचं स्वप्नही साकार केलं आहे. नवरात्र सुरू झाल्यापासून तेजस्विनीची वेगवेगळी रूपं प्रेक्षकांना पहायला मिळत आहेत.

नवरात्र सुरू झाल्यानंतर तेजस्विनीनं महालक्ष्मीच्या अंबाबाईचं रूप धारण करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर कामाख्या देवी आणि जरीमरी आईच्या रूपातही तेजस्विनी प्रगटली. मेकअप आणि गेटअपच्या माध्यमातून देवीची रूपं सादर करणारी तेजस्विनी आता महालक्ष्मीच्या लुकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

आजवर बऱ्याच धार्मिक पुस्तकांच्या कव्हरवर आणि भक्तांच्या देव्हाऱ्यात पूजन केल्या जाणाऱ्या महालक्ष्मीचं रूप तेजस्विनीनं धारण केलं आहे. कमळाच्या फुलात विराजमान झालेली, डोक्यावर भरजरी मुकूट, गळ्यात दागिने, डाव्या हातानं सुवर्णमुद्रा देणारी आणि उजव्या हातानं भक्तांना अशीर्वाद देणारी तेजस्विनी या फोटोंमध्ये पहायला मिळते.
संबंधित विषय
ताज्या बातम्या