अनुष्काचं 'गोल्डन ट्वीट'!

विवाह झाल्यानंतर अनुष्का शर्मानं तिच्या ट्वीटर अकाऊंटवरून एक ट्वीट करत विराटसोबत आपण विवाह केल्याचं जाहीर केलं. लग्नातील विधी सुरू असतानाचा एक फोटो पोस्ट करत तिनं ही आनंदाची बातमी दिली. तिचं हेच ट्वीट यंदाच्या वर्षीचं'गोल्डन ट्वीट' ठरलं आहे.

SHARE

मोस्ट हॅपनिंग कपल म्हणून ओळखले जाणारे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचं लग्न यावर्षी सर्वात अधिक चर्चेचा विषय ठरलं. इटलीमध्ये अत्यंत खाजगी समारंभात दोघांनी विवाह केला. त्यानंतर त्यांच्या लग्नाची खबर वाऱ्यासारखी पसरली. विवाह झाल्यानंतर अनुष्का शर्मानं तिच्या ट्वीटर अकाऊंटवरून एक ट्वीट करत विराटसोबत आपण विवाह केल्याचं जाहीर केलं. लग्नातील विधी सुरू असतानाचा एक फोटो पोस्ट करत तिनं ही आनंदाची बातमी दिली. तिचं हेच ट्वीट यंदाच्या वर्षीचं'गोल्डन ट्वीट' ठरलं आहे.११ डिसेंबरला विराट आणि अनुष्काची लग्नगाठ बांधली गेली होती. लग्नाचा फोटो शेअर करत अनुष्कानं लिहिलं की, प्रेमाच्या नात्यात शेवटच्या क्षणापर्यंत बांधले जाण्याचं वचन आम्ही एकमेकांना दिलं आहे. ही बातमी तुम्हा सर्वांना सांगण्याची संधी मला मिळतेय, यात आमचेच भाग्य आहे. कुटुंब आणि चाहत्यांच्या प्रेमामुळे, त्यांच्या पाठिंब्यामुळे हे क्षण आणखीनच महत्त्वपूर्ण झाले आहेत. आमच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात साथ देण्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार.

अनुष्कानं तिच्या लग्नाच्या फोटोसह केलेलं ट्वीट यंदाच्या वर्षी सर्वाधिक वेळा रिट्वीट केलं गेलं आहे. त्यामुळे यावर्षी तेच 'गोल्डन ट्वीट' ठरलं आहे, असं ट्वीटरकडून सांगण्यात आलं आहे.


संबंधित विषय
ताज्या बातम्या