Advertisement

प्रार्थना बेहेरे, अनिकेत विश्वासरावच्या कारला अपघात, दोघे सुखरुप


प्रार्थना बेहेरे, अनिकेत विश्वासरावच्या कारला अपघात, दोघे सुखरुप
SHARES

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्या कारला सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. हे दोघंही ‘मस्का’ या आगामी मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कोल्हापूरला जात असताना लोणावळा येथे त्यांच्या कारला अपघात झाला.

या अपघातात प्रार्थनाच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. दरम्यान तिच्या असिस्टंच्या डोक्यालाही मार लागला आहे. अपघाताच्या वेळी झाला कारमध्ये अनिकेत, प्रार्थना, प्रार्थनाची असिस्टंट आणि चालक असे चौघेजण होते.


पुण्यावरून कोल्हापूरला जाताना लोणावळ्याच्या रस्त्यावर पोहचल्यानंतर ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्यांची कार एका टेम्पोला धडकल्याने हा भीषण अपघात झाला. यावेळी कारचा चक्काचूर झाला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार त्यांची कार रस्त्याच्या डाव्या बाजूने जात असताना अचानक टेम्पो समोर आला. दरम्यान त्या टेम्पोपासून आपला बचाव करण्यासाठी चालकाने कार वळवली खरी, पण त्याचवेळी त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल.

मस्का या चित्रपटातून प्रार्थनाचा बोल्ड अंदाज लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. याशिवाय अभिनेते शशांक शेंडे, विद्याधर जोशी, प्रणव रावराणे याच्याही भूमिका महत्त्वाच्या आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा