Advertisement

मांजरेकरांच्या चित्रपटात अक्षयकुमार छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत

'वेढात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाचा शुभारंभ एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला.

मांजरेकरांच्या चित्रपटात अक्षयकुमार छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत
SHARES

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या मेगा प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली.

'वेढात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाचा शुभारंभ एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार दिसणार आहे. शिवरायांच्या व्यक्तिरेखेतील अक्षयचा फर्स्ट लूकही यावेळी लाँच करण्यात आला.

या सिनेमातून बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे आणि विशाल निकम हे त्रिकूट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत प्रख्यात अभिनेते प्रवीण तरडे दिसणार आहेत.

या सिनेमातून बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे आणि विशाल निकम हे त्रिकूट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत प्रख्यात अभिनेते प्रवीण तरडे दिसणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यावर वाकडी नजर ठेवून असलेल्या बेहलोल खानला सात शिलेदारांनी कशी झुंज दिली, यावर या चित्रपटाचं कथानक बेतलं आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमाला राज ठाकरे यांनी क्लॅप दिली. गंमत म्हणजे, मुख्यमंत्री शिंदे यांच्या चेहऱ्यासमोरच राज यांनी क्लॅप देत मुख्यमंत्र्यांना हिरो बनवण्याचा प्रयत्न केला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा