Advertisement

आदित्य पांचोलीला एक वर्षाची शिक्षा


आदित्य पांचोलीला एक वर्षाची शिक्षा
SHARES

अंधेरी - मारहाण प्रकरणात अभिनेता आदित्य पंचोलीला न्यायालयानं एक वर्षाची शिक्षा आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावलाय. अंधेरी दंडाधिकारी न्यायालयानं ही शिक्षा सुनावलीय. मात्र आदित्य पंचोली शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहे. त्यामुळे तबर्तास त्याची जेलवारी टळली असून त्याला जामीनही मंजूर करण्यात आलाय. उच्च न्यायालयात अपील करेपर्यंत हा जामीन असेल.
आदित्य पांचोलीनं 2005 साली सोसायटीच्या पार्किंगमध्ये एका व्यक्तीला मारहाण केली होती. याप्रकरणी प्रतिक नावाच्या व्यक्तीनं आदित्य पांचोलीविरोधात तक्रार दाखल केली होती.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा