Advertisement

महानायकाची ट्विटरवरून एक्झिट घेण्याची धमकी, असं का?


महानायकाची ट्विटरवरून एक्झिट घेण्याची धमकी, असं का?
SHARES

नेहमी ट्विटरवर अॅक्टिव्ह असणारे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अमिताभ यांनी चक्क ट्विटरवरून एक्झिट घेण्याची धमकीच दिली आहे. पण असं काय झालं ज्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला या विचारात सध्या त्यांचे चाहते आहेत.


का घेतला हा निर्णय?

एकीकडे शाहरूख खान ट्वीटरवर नंबरवन ठरला आहे. मात्र अमिताभ यांनी अचानकपणे ट्वीटरवरून एक्झिट घेत असल्याचं जाहीर केल्यामुळे चाहत्यांनाही आश्चर्य वाटलं आहे. खरंतर ट्विटरने आमिताभ यांचे फॉलोअर्स घटवले यामुळे अमिताभ संतापले, असं त्यांनी केलेल्या ट्वीटवरून कळतंय. यामुळे नाराज होऊन अमिताभ यांनी ट्विटर सोडण्याची धमकीच दिली आहे. बुधवारी रात्री ११.३५ वाजता अमिताभ यांनी ट्वीट करत ही माहीती ट्वीटर आणि आपल्या चाहत्यांना दिली.



काय म्हणाले अमिताभ?

अमिताभ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय, 'ट्विटर आपण माझ्या फॉलोअर्सचा आकडा कमी केलात? ही गंमत आहे का? निरोप घेण्याची वेळ आता आलीये. आतापर्यंतच्या प्रवासासाठी आभार, त्याचप्रमाणे या समुद्रात आणखीही अनेक मासे आहेत आणि जे अधिक रोचक आहेत.’ असं म्हणतं अमिताभ यांनी ट्विटरवर फॉलोअर्स घटवण्याचा आरोप केला आहे. या ट्वीटची सुरूवात त्यांनी T2599 अशी केली आहे. याचा अर्थ अमिताभ यांनी आतापर्यंत २५९९ ट्वीट केले आहेत. आता हे ट्वीट गमतीत केलंय की खरोखर ते ट्वीटर सोडतायत हे लवकरच स्पष्ट होईल. 

अमिताभ यांचे ट्विटरवर ३,२८,९७,९९१ फॉलोअर्स आहेत. आतापर्यंत अमिताभ यांनी ट्विटरवरून त्यांचे अनेक जुने फोटो शेअर केले आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा